💥गंगाखेड तालुक्यातील मौजे वृंदावन जवळा (रु) येथे गीता जयंती उत्साहात साजरी.....!


💥गीतेच्या पाठाच्या विद्यार्थ्यांनी गीतेच्या १८ अध्यायाचे पारायण पूर्ण केले💥


गंगाखेड (प्रतिनिधी) - गंगाखेड तालुक्यातील मौजे वृं.जवळा (रु) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून. प. प. श्री श्री श्री १००८ महंत  पद्मनाभानंद गिरी महाराज( उत्तर अधिकारी ) श्री तुळजाभवानी संस्थान राजगादी राजा टाकळी गोदावरी किनारा ता. घनसावंगी जि. जालना यांनी व गीतेच्या पाठाच्या विद्यार्थ्यांनी  गीते च्या १८ अध्यायाचे पारायण पूर्ण केले.

 त्यानंतर त्यांनी गीतेचे महत्व पटवून सांगितले. व आजचा आनंद हा वेगळाच आहे अशी त्यांनी सांगितले. भगवद्गीतेची आरती व पांडुरंगाची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसाद सर्व भाविक भक्तांनी घेतला यामध्ये सर्व गावकरी मंडळी .  सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या