💥परभणी जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पात समावेश केल्याबद्दल भगीरथ पाणी परिषदेने उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार....!


💥मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे विशिष्ट कालावधीनंतर निर्माण होते, हे मागील काही वर्षात दिसून आले आहे💥

परभणी (दि.30 डिसेंबर) : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात परभणी व हिंगोली जिल्ह्याचा समावेश केल्याबद्दल भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहे.

        महाराष्ट्र विधी मंडळातील चर्चे दरम्यान वैनगंगा-नळगंगा हा विदर्भासाठी वरदान असलेला संपूर्ण विदर्भाला नवसंजीवनी देणारा तसेच 5 लाख 72 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणारा 82 हजार कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती सादर केली. त्यावेळी या नदीजोड प्रकल्पांतर्गत अतिरिक्त पाणी उपलब्धता ही परभणी व हिंगोली जिल्ह्यापर्यंत नेण्याची रचनासुध्दा विशद केली. त्यासंबंधीची माहिती दिली.

       मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे विशिष्ट कालावधीनंतर निर्माण होते, हे मागील काही वर्षात दिसून आले आहे. त्यामुळेच वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा, कयाधू व पैनगंगा नदीचा समावेश या प्रकल्पात कायमचा (केवळ अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास नव्हे) तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औढा नागनाथ, कळमनूरी तालुक्यास व परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यास झाल्यास या भागातील लोकांना पाणी उपलब्धता होवून सिंचनाचा लाभ मिळणार आहे, असे भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी नमूद केली. यापूर्वी देखील आपण कृष्णा कोयणेचे अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविण्याची घोषणा केली आहे. तसेच पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी देखील आपण गोदावरीमध्ये आणण्याची कारवाई प्रगतीत आहे. त्यामुळे ही सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्यास मराठवाड्यात पाण्याची विपूल उपलब्धता निर्माण होवून मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार आहे, असे म्हटले. याबद्दल समस्त मराठवाड्याच्या जनतेच्या वतीने व भगिरथ पाणी परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन करतेवेळी तेलंगणातील काळेश्‍वरम प्रकल्पाच्या धर्तीवर आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण कराल, असा विश्‍वास आहे, असेही जोशी यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या