💥परभणी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना अंत्योदय शिधा पत्रिका वाटप....!


💥दिव्यागांनी अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी केले💥

परभणी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधा पत्रिका वाटप करण्यात आल्या राज्य‌ शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची दिव्यांगांना माहिती व्हावी,यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून तालुकास्तरीय अंत्योदय शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या तसेच दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेतला नाही, अशा लाभार्थींनी पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या