💥पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अखंड शिवनाम महिला प्रबोधन सप्ताहाची सुरवात.....!

 


💥सरपंच सौ.शकुंतला गव्हाळे यांच्या हस्ते पूजन करीत अखंड शिवनाम महिला प्रबोधन सप्ताहाची सुरवात💥

पूर्णा (दि.०६ डिसेंबर) - तालुक्यातील फुलकळस येथील पावन झालेल्या पवित्र भूमीत शिवनामाचा जयघोष राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचर्य महाराज यांच्या माध्यमातून फुलकळस येथे मागील ४७ वर्षा पासून चालत आलेल्या महिला मंडळाच्या सप्त्याहाला संपूर्ण महिला या अखंड शिवनाम सप्ताहत महिला सहभाग घेत आहेत. (दि. ३०) तारखेपासून या सप्ताहाला सुरावात होत आहे.


या सप्ताहात शि भ. प.संगीता ब्याळे ,शकुंतला चाकोते, स्वरवतीताई स्वामी,किशोरीताई ताकबीडकर ,अलकाताई तोंडारे, कावेरीताई मुदखेडे,स्वातीताई तमशेटे  या महिलांचे कीर्तन होणार आहे.यात लक्ष्मीबाई सोनाजी शिराळे,शोभाबाई  गणपतराव शिराळे,भाग्यश्री संदीप धुळशेटे,पार्वती भीमाशंकर शिराळे, मीनाताई यशवंत शिराळे,यमुनाबाई बाबुराव भाटेगावकर ,लक्ष्मीबाई डिगांबर शिराळे  या महिलांच्या वतीने ७ दिवसाच्या अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्तहाची सांगता श. ब्र .१०८ डॉ. नंदीकेस्वर शिवाचार्य महाराज लासिनमठ पूर्णा यांचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहाची सुरुवात फुलकळस ग्रामाच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती शकुंतलाताई नागोराव गव्हाळे यांच्या हस्ते पूजनाने झाली या समयी श्रीमती सुलोचना शिवणकर श्रीमती यशोदाबाई शिराळे श्रीमती अहिल्याबाई शिराळे सौभाग्यवती विमल सरकाळे सौभाग्यवती इत्यादी गावातील महिला मंडळांची उपस्थिती होती. लक्ष्मीबाई सोनबा शिराळे सौभाग्यवती भोगावती कुबडे सौभाग्यवती यमुनाबाई भाटेगावकरया सप्ताहात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान विश्वेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या शिवनाम सप्ताह समारंभात महिलांचे प्रबोधन व्हावे त्यांना नामस्मरणाची गोडी लागावी याविषयीची प्रवचने संपन्न होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी महिलांद्वारे महिलांसाठी महिलांचे प्रबोधन करण्यासाठी, त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आहे. या सप्ताहातील विविध कार्यक्रमात गावातील सर्व मंडळी सक्रिय सहभागी होऊन समारंभ यशस्वी करत असतात या समारंभात परमार्थातून प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री विश्वेश्वर महिला सप्ताह कमिटी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या