💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गौर शिवारात ५७ वर्षीय इसमाची तिष्ण शस्त्राने भोसकून हत्या...!


💥सोबत्यानेच आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून निर्घृण हत्या केली असावी असा अंदाज संशयीत आरोपी फरार💥

पुर्णा (दि.१५ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गौर शिवारातील नामदेवराव राजभोज यांच्या शेतात गौर येथील ५७ वर्षीय इसम जयवंतराव नारायन शिंदे यांचा अत्यंत निर्दैयीपणे तिष्ण धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ०८-०० ते ०९-०० वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणाचा उलगडा आज गुरुवार दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास झाल्याने चुडावा पोलिस स्थानकाचे सपोनि.मुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळ पंचणामा करून मयताचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालयात पाठवले.

या प्रकरणात मयत जयवंतराव शिंदे यांच्या सतत सोबत राहणारा आरोपी भगवान बापुराव पारवे रा.गौर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाल्याचे समजते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या