💥महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे डॉक्टरेट पदवी प्रदान....!


💥सिद्धार्थ हत्तीअबीरे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून बुद्धिस्ट रिसर्च केंद्राकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान💥 

परभणी (दि08 डिसेंबर) - व्हियतनाम बुद्धिस्ट रिसर्च केंद्र (व्हियतनाम) ही धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी महत्वाची संस्था आहे. दरवर्षी या संस्थेच्यावतीने भारतात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तीन व्यक्तींना अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मानद डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात येते. यंदा वा संस्थेने विविध क्षेत्रातील भारतात आपले भरीव योगदान देणाऱ्या निवडक तीन व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले; त्या निवडक व्यक्तीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर प्रसिद्ध सिने अभिनेते व बौद्ध धम्म प्रचारक गगन मलिक यांचा समावेश आहे. 

व्हिबतनाम बुद्धिस्ट रिसर्च केंद्र (व्हियतनाम) त्रिरत्न भुमी फाउंडेशन (थायलंड) व गगन मलिक फाऊंडेशन (इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 05 डिसेंबर 2022 रोजी सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह चैत्यभूमीजवळ, दादर, मुंबई येथे भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थायलंड, व्हिएतनाम व भारत देशाच्या विविध प्रदेशातील उपस्थित भदंतांच्या, राज्याच्या माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धार्थ हत्तिअंबिरे भीमराव आंबेडकर व गगन मलिक यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. हत्तीअबीरे यांच्या आजवरच्या सर्व कार्याची नोंद घेवुन आंतराष्ट्रीय संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. भदंत उपगुप्त महाथेरो, प्रा. डॉ संजय जाधव, डॉ प्रकाश डाके, भीमराव शिंगाडे, डॉ भीमराव खाडे, डॉ बी डी धुतमल, भगवान जगताप, अविनाश मालसमिंदर, सुधीर कांबळे, चंद्रशेखर साळवे,उतम गायकवाड, पदिष जोंधळे, शशीकांत हत्तीअबीरे आदी मान्यवरांनी  हत्तिअबिरे याचे अभिनंदन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या