💥पुर्णा येथील श्री.गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात युवा परिवर्तन मार्फत रोजगार प्रशिक्षण शिबिर संपन्न....!


💥सदरील शिबिरात युवा परिवर्तनचे विभागीय संचालक श्रीकृष्ण वानखेडे व सिंधू वासमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले💥

पूर्णा. (दि.०९ डिसेंबर) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील "करियर  गाईडन्स अँड प्लेसमेंट सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष" आणि खेरवाडी येथील ‘युवा परिवर्तन‘ या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.


सदरील शिबिरात युवा परिवर्तन चे विभागीय संचालक श्रीकृष्ण वानखेडे तसेच सिंधू वासमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव मा. गोविंदराव कदम,  सीमा चव्हाण, सिंधू ठाकूर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंधू वासमवार यांनी युवा परिवर्तन अंतर्गत येणाऱ्या अनेक कोर्स विषयी मार्गदर्शनकरून विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त रोजगार करून उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. श्रीकृष्ण वानखेडे यांनी कौशल्यावर आधारित रोजगार  करणारे एकूण 150 अभ्यासक्रमा विषयी माहिती दिली. तसेच कौशल्य  रोजगार आणि उद्योजकता विषयी मार्गदर्शेन केले ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी व क्षेत्र कोणते आहे यावर अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमातून तरुणांनी रोजगार मिळण्याची व्यवस्था कौशल्य अंतर्गत येणाऱ्या विविध रोजगार व प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली.

कौशल्याविकास  हे रोजगार विकासासाठी माध्यम म्हणून काम करण्याबरोबरच तरुणांची मागणी असणाऱ्या कोर्सेसची  जेणेकरुन रोजगाराबरोबरच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.शिक्षण पूर्ण करून अनेक जण नोकरी करतात. मात्र, व्यवसाय करण्यासाठी वेडच असावं लागत. छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय असावा हे स्वप्न असतं. अनेकांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळत नाही. यातून अनेक अडचणी येतात. सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून ही युवा परिवर्तन योजना राबली जाते. छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. या योजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होते. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला सहकार्य होते असे त्यांनी सांगितले. मा. गोविंद कदम यांनी सदरील शिबिराचा अध्यक्षीय समारोप केला. महाविद्यालयातील करियर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने एकूण 11कोर्स सुरुवात करण्यात आली असे समनव्यक डॉ. जितेंद्र पुल्ले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पुल्ले यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रविंद्र राख, श्री शेख,श्री शिंदे, श्री अंबेकर, श्री पंडित, श्री वाघमारे,श्री बाहेती,डॉ.सोमनाथ गुंजकर, श्री कालिदास वैद्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या