💥सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या एकल कलाकारांना एकरकमी लाभासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ...!


(फाईल चित्र)

💥परभणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे💥

परभणी (दि.06 डिसेंबर) : राज्यात कोविड काळातील टाळेबंदीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या एकल कलाकारांना एकरकमी अर्थसहाय्यासाठी 31 मार्च, 2023 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

कोविड काळात घातलेल्या निर्बंधांमुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असल्याने एकल कलाकारांना दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व मिळणाऱ्या उत्पन्नापासून वंचित रहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित कार्यक्रमही स्थगित करण्यात आले होते. या कलाप्रकारातील विविध कलाकारांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे, असल्याने त्यांची आर्थिक कुचंबना झाली. अशा एकल कलाकारांना राज्य शासनाने एकरकमी 5 हजार रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने 3 नोव्हेंबर, 2021 च्या शासन निर्णयान्वये घेतला असून, आता शासनाने 'योजना अंमलबजावणीची कालमर्यादा' दि. 31 मार्च, 2023 पर्यंत वाढविली आहे. 

पात्र एकल कलाकार लाभार्थ्याची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय निवड समितीने पात्र केलेल्या कलाकारांची यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुज्ञेय अर्थसहाय्य शासनाकडून वर्ग करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या