💥जिंतूर- सेलू मतदारसंघातील 28 ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्वाचा दावा....!


💥माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मिळाले यश💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर आणि सेलू तालुक्यातील एकूण 43 पैकी 28 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने 'वर्चस्व राखले आहे. माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला हे यश मिळाले आहे.

जिंतूर तालुक्यामध्ये 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर आणि सेलू तालुक्यातील 11 पैकी 6 ग्रामपंचायतीवर भाजपने विजय [संपादित केला आहे. जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा, माणकेश्वर, चारठाणा, देवसजी, दुधगाव, आसेगाव, हाल नरसिंह, घोटवाडी, पिंपळगाव गायके, इटोली, साईनगर तांडा, जांब बुद्धक, धानोरा देवगाव, बोडी, सोस, देवगाव धानोरा, मालेगाव दुधना, कडा, नांदगाव दुधना, राजेगाव, कुंभारी, मांडवा तर सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी, धामणगाव, राधे धामणगाव, डासाळा, कुपटा, डिग्रस पोळ या सर्व ठिकाणी निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, कृष्णा देशमुख, सुनिल भाँगे, दत्ता कटारे, मुखा पाये, आत्माराम पवार, प्रदीप चौधरी, कैलास खंदारे, रामभाऊ राठोड, उत्तम जाधव, अशोक बुधवंत, मनोहर सातपुते, युवराज धनसावंत, मतीन, केशव घुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या