💥परभणी जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान गैरहजर 13 जणांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव....!


💥प्रस्ताव जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे💥

परभणी (दि.19 डिसेंबर) : जिल्ह्यात 119 ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रशिक्षण घेतल्यानंतर गैरहजर राहिलेल्या 13 अधिकारी-कर्मचा-यांविरोधात निलंबन किंवा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्राधिकारी म्हणून कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही कर्मचारी दोन वेळा प्रशिक्षण घेऊन शनिवारी (दि. 17) निवडणूक कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने निवडणूक कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे संबंधीत 13 अधिकारी आणि कर्मचा-यांविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक रानिआ-२००६/प्र.कृ.१४/का-५, दि. 2 ऑगस्ट 2006  अन्वये निलंबन किंवा शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी (दि.18) जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आला असल्याचे तहसीलदार (निवडणूक)  यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या