💥मजलिस-ए-इन्सानियत मार्फत हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी.....!


💥या वेळी ॲड.एस.यू.हसन,वैभव शेटे महाराज,गोविंद गिरी आदींनी टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला💥

परभणी :- अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रज आपली सत्ता भारतात प्रस्तापित करण्याच्या प्रयत्नात असताना सर्व प्रथम इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे तत्कालीन म्हैसूर राज्याचे सुलतान, शेर ए म्हैसूर, शेर ए हिंद, नसिब-उद-दौला हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या जंतीनिमित्त मजलिस-ए-इन्सानियत, परभणी मार्फत जलसे-ए-आम कार्यक्रम मानव मुक्ती मिशन चे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली यशवंत गुरुकुल, उघडा महादेव परिसरात दि. 10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या वेळी ॲड. एस. यू. हसन, वैभव शेटे महाराज, गोविंद गिरी आदींनी टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या वेळी मजलिस-ए-इन्सानियत चे जिल्हा कायदेविषयक सल्लागार ॲड. एस. यू. हसन, स्वराज इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी, मानव मुक्ती मिशन चे जिल्हाध्यक्ष अजित कदम, जिल्हा प्रवक्ता वैभव शेटे महाराज, शेख सोहेल,  यशवंत गुरुकुल चे संचालक पांडुरंग डुकरे, सय्यद मोहत्तसीन, क्षतृत्न दुधाने, सय्यद इर्शाद आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अझहर यांनी केले तर प्रास्ताविक काशिफ रजा यांनी केले व आभार प्रदर्शन शेख मुसेफ यांनी केले. या वेळी मजलिस-ए-इन्सानियतचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व यशवंत गुरुकुल चे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या