💥परभणीत श्रीक्षेत्र परशुराम कुंड रथयात्रेचे जोरदार स्वागत....!


💥यावेळी जय परशुरामच्या जयघोषात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले💥

परभणी (दि.18 नोव्हेंबर) - अरूणाचल प्रदेशातील श्रीक्षेत्र परशुराम कुंड या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी 51 फुट उंच श्री भगवान परशुराम यांची पंचधातुची मूर्ती स्थापित होणार आहे. याबाबत प्रसार प्रचार करिता देशव्यापी रथयात्रा आयोजीत करण्यात आली असून या रथयात्रेचे परभणीत आज शुक्रवार दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी भव्य स्वागत करण्यात आले.


 
शुक्रवारी सकाळी रथयात्रा शहरात दाखल झाली. यावेळी जय परशुरामच्या जयघोषात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणि,भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, शिवसेना(शिंदे गटाचे) भास्कर लंगोटे, सुनिल देशमुख, अनिल डहाळे, प्रशास ठाकूर, सुहास डहाळे, अरविंद देशमुख, रितेश जैन, माजी नगरसेविका मंगला मुद्गलकर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे, भाजपा महानगराध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह  विप्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर.बी.शर्मा, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश बुटोले, रामनारायणदास महाराज, अ‍ॅड.रमेश शर्मा, बंडूनाना सराफ, सी.ए.अनुप शुक्ला, सी.ए.ओझा, मंदार कुलकर्णी, संदिप देशमुख, मकरंद कुलकर्णी, नवनीत पाचपोर, अ‍ॅड.राजकुमार भांबरे आदींसह विप्र फाऊंडेशन व बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शनिवार बाजार येथील रेणुकामाता मंदिरापासून रथयात्रेस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, नारायणचाळ, स्टेशनरोड मार्गे श्री पेढा हनुमान मंदिरापर्यंत भव्य रथयात्रा निघाली. रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने ब्रम्हवृंदाचा सहभाग होता. तसेच महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. रथयात्रेचे ठिकठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवृष्टीकरून स्वागत करण्यात आले. भगवान परशुरामाची वेशभुषा परिधान करून रूद्र सचिन शेटे रथयात्रेत सहभागी झाला होता.  

श्री पेढा हनुमान मंदिर येथे समारोप प्रसंगी खासदार संजय जाधव, हभप माधवबुवा आजेगावकर, नित्रुडकर गुरूजी, नरहरी गुरूजी एरंडेश्‍वरकर, रामनारायणदास महाराज, रविंद्र पतंगे आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या