💥चारठाणा पर्यटन विकास अंतर्गत 'क' दर्जा ऐवजी 'ब' दर्जा देण्याची मागणी....!


💥जिल्हा परिषद सदस्या सौ.मिनाताई राऊत यांची मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी  बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे चालू असणाऱ्या जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून दि २४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी चारठाणा जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाताई राऊत यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.


सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यातील चारठाणा येथे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाला दर्जा 'क' प्राप्त आहे. चारठाणा येथे जवळपास ३६५ हेमाडपंथी मंदिरे असून त्यासाठी आपण आपल्या स्तरावून 'क' दर्जा ऐवजी 'ब' दर्जा मिळवून देण्यात यावा तसेच पर्यटनाकडे जाण्यासाठी रस्त्याची सुविधा पर्यटन निवास गार्डन व नरसिंह तीर्थ मंदिर येथे जाण्यासाठी झुलता पूल व रस्ता करण्यात यावा. व कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून प्राचीन मंदिरे यांचा पर्यटक दर्जा उंचावेल असे या निवेदना द्वारे जिल्हा अधिकारी यांना मागणी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या