💥नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर आ.मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची नियुक्ती....!


💥नवीन शैक्षणिक धोरण सुव्यवस्थित अंमलबजावणीसाठी तरुण आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांची आश्वासक भूमिका💥

परभणी (दि.०५ नोव्हेंबर) : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभा सदस्य आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाकडुन त्यांना नामनियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल .विधानसभा अध्यक्ष,.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत नांदेड व औरंगाबाद, वनामवि, परभणी विद्यापीठांचे कुलगुरू महोदय, प्रोफेसर, संस्थाचालक, विविध आस्थापनांचे कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले. अधिसभा सदस्य म्हणून वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आमदार मेघना साकोरे  महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायत राज समितीवर सदस्य,परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ या कायद्यानुसार महाराष्ट्रातील विधानसभा, विधानपरिषद, मुंबई महापालिका व नगरपालिका सदस्यांपैकी जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतात, असे अधिसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे. त्या अनुषंगाने माननीय विधानसभा अध्यक्ष यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या सदस्यपदी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालया द्वारे तसे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. 

💥नविन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार :- 

माझ्या कार्यालयाकडून नुकतेच एक पत्र माझ्या हाती आले, त्याद्वारे अधिसभा सदस्य म्हणून माझी नियुक्ती मा. विधानसभा अध्यक्ष यांनी केल्याचे कळाले. ज्यांनी माझी निवड केली त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. नवीन शैक्षणिक धोरण अतिशय आश्वासक आहे, लवचीक आहे. पूर्वीच्या धोरणातील अनेक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न या धोरणात केलेला आहे. पण अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अनेक समस्या समोर दिसत आहेत. पालक, शिक्षक, संस्थाचालक व शासन यांच्या समन्वयातून या समस्यांवर उत्तर मिळेल व त्यातून नवीन पिढीला अधिक प्रभावी कार्यक्षम शिक्षण देता येईल यासाठी मी अधिसभा सदस्य म्हणून प्रयत्नशील असेल...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या