💥परभणीत समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णाला रक्तदान....!


💥तिन रक्तदात्यांनी मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून गरजू रुग्नाला वेळेत पेश्या उपलब्ध करून दिल्या💥

परभणी /प्रतिनिधी :  दिनांक 10 नोव्हेंबर रोजी  परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथिल अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका 14 वर्षीय मुलाला A+ पॉझिटिव्ह रक्त गटाच्या पांढऱ्या पेशींची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी 3 रक्तदाते लागत होते. तेंव्हा शहरातील रुग्णांच्या मदतीसाठी सदव्य कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने त्या रुग्णास प्रतिष्ठान चे सदस्य  दीपक बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक खारकर व शिवाजी कॉलेज पॉलटेक्निकल ला शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी रमीज उर रहेमान यांनी पाहिलीच वेळेस या तिघांनी मेट्रो ब्लड बँक परभणी येथे रक्तदान करून वेळेत पेश्या उपलब्ध करून दिल्या आहेत. 

          रक्तदान करून वेळेत पेश्या उपलब्ध करून दिल्या बद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने तिन्ही रक्तदात्यांचे पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले. त्याच बरोबर रुग्णाचे नातेवाईक राजेश कांबळे यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले तर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, प्रसिद्धी प्रमुख शेख अझर, प्रा.सुशांत येळनुरे,  सामाजिक कार्यकर्ते ABVP चे पदाधिकारी सचिन लांबोटे, जयभय्या शिंदे, श्रेयस क्षीरसागर, प्रकाश अंभोरे, बाळू भाऊ घीके, राहुल धबाले, सय्यद जमील, बालाजी कांबळे, राजू कर्डिले, रियाज कुरेशी आदींनी रक्तालीत पेशी उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले. त्याच बरोबर ब्लड बँक कर्मचारी डॉ राठोड मॅडम, दीपक कंडेरे, किशोर जाधव, हमीद सिद्दीकी, अनिल सावंत, विठ्ठल शिंदे, माधव गोचडे,  अतुल जाधव, आत्माराम जटाळे,  मारोती क्षिरजवार यांचेही सहकार्य लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या