💥परभणी येथील एकता नगरातील गांधी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण...!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्षाविभाग प्रमुख श्री खेडकर सर हे होते💥


परभणी (दि.३० नोव्हेंबर) - येथील एकता नगर मधील गांधी विद्यालयात आज बुधवार दि.३० नोव्हेबर २०२२ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्षाविभाग प्रमुख श्री खेडकर सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून इयत्ता १० वी चे वर्गशिक्षक श्री. देशमुख सर श्री. आव्हाड सर, श्री. साळवे सर आणि श्री. गरुड सर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ढेले सर यांनी तर आभार सौ. जोशी मॅडम यांनी केले.


या कार्यक्रमात इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रथम घटक चाचणी परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त शैक्षणीक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी मनपा तर्फे आयोजित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत गांधी विद्यालयाचा दबदबा कायम राखत विविध स्पर्धेत जिल्हा प्रथम (सांघिक व वैयक्तिक) येऊन शाळेचे नाव उंचावल्या बद्दल क्रीडाशिक्षक आदरणीय श्री. पी. आर. जाधव सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 


सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गांधी विद्यालय एकता नगर शाखा पर्यवेक्षक आदरणीय श्री. आर. आर. जाधव सर, स. पर्यवेक्षक श्री. पी. आर. जाधव सर आणि श्री. आर. यू. चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या