💥शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी परिस्थितीवर मात करत राज्य विक्रीकर निरीक्षक परिक्षा उतीर्ण....!


💥महाराष्ट्रातून मुलीमधून कु.विद्या अंकुश कांदे हिने मिळवला सहावा क्रमांक💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली  : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या  एका मुलीने  देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे या मुलीने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून सहावा  क्रमांक पटकवला आहे. 


 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या  2021 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील कु  विद्या अंकुश कांदे  हिने  घवघवीत यश मिळालं आहे. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांनीची असते. असा तरुनीसाठी विद्या कांदे  ची   कहाणी प्रेरणादायी आहे.

एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेचा निकाल लागला. यात विद्या 277.5 मार्क मिळाले  आहेत. या गुणांसह विद्याने  राज्यात सहावा  क्रमांक पटकावला आहे. 2021 साली विद्याने  ही परीक्षा दिली होती.विद्याच्या  या यशाबद्दल तिचे  सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सुरुवातीला पासून शिक्षणात हुशार :-

 कु.विद्याचे  सुरुवातीचे शिक्षण तिने साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत  10 वी पर्यन्त शिक्षण घेतले व नंतर 11 वी व 12  वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयत पूर्ण केले व सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे हि नौकरी करत तिने महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक या पदावर तिची निवड झाली आहे व महाराष्ट्रातून मुली मधून सहावा क्रमांक तिने पटकावला आहे  विद्याच्या ह्या यशा मागें तिच्या भावाचा सिंहाचा वाट विद्या लहान असतांना तिचे वडील वारले आई ने काबड कष्ट करू मुलाबाळांना शिकवले मात्र जसे मुले मोठी होत गेली तसा शिक्षणाचा खर्च देखिल जास्त लागत होता विद्याचा  भाऊ विकास कांदे यांनी स्वताचे शिक्षण कमी केले मात्र आपल्या बहीनेचे शिक्षण त्याची पूर्ण केले आज तिचे राज्य कर निरीक्षक पदावर झाल्या बद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतुक केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या