💥जिंतूर शहरातील आमदार कॉलनीतील रहिवाशांचा रस्ता बंद करुन अंतीक्रमन केल्यामुळे आंदोलनाचा इशारा....!


💥सदरील रस्त्यावर आजपर्यंत कसलाही अडथळा अथवा अतिक्रमण नव्हते💥

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर शहरातील आमदार कॉलनीत मागील 35 वर्षापासून सर्वे नं. 130/2 मध्ये काही नागरिकांचे प्लॉट आहेत. मात्र नगर परिषदेच्या वतीने मागील 30 वर्षापासून प्लॉट सोडून  दूरवर  सिमेंट रोड व नाल्या बांधलेल्या आहेत. आमदार फॉलनीतील सत्यनारायण शर्मा यांच्या  घरापासून पश्चिमेकडे जाणारा 25 फुटाचा रोड हा थेट मुख्य मोठा बलसा रोडला (55 फुटाचा ) जाऊन मिळतो. सदरील रस्त्यावर आजपर्यंत कसलाही अडथळा अथवा अतिक्रमण नव्हते.


या भागातील नागरिकांनी सदर रस्त्याचा वापर व वहिवाट केलेली आहे व रस्त्याच्या दुतर्फा त्यांची  घरे आहेत, सदर रस्ता हा थेट मुख्य रस्त्याला म्हणजेच  55 फुटाच्या बलसा रोडला जाऊन मिळत असल्यामुळे आमची वहिवाट व वाहतूक याच मार्गाने होत होती. परंतु मागील काही दिवसापासून बलसा रोडला जोडणारा रस्यावर  महेबुब खाँ करीम खाँ पठाण या व्यक्तीने रातोरात टिनपत्रे मारून रस्ता वहिवाटीचा, वाहतुकीचा बंद केलेला आहे. रहिवाश्यांनी  त्यास रस्ता का बंद केला याबाबत विचारणा केली तर हे माझे प्लॉट आहे. मी तुम्हाला येथून जाऊ देणार नाही अशा शब्दात सांगून त्यांच्या  सोबत बाचाबाची केलेली आहे.

सदर रस्त्यावर या व्यक्तीचा यापूर्वी कधीही ताबा   अथवा हक्क  सांगितलेला नाही. शिवाय 30 वर्षापासून  सदर रस्ता वहिवाटी वाहतुकीसाठी मोकळा होता. अचानक महेबुब खाँ यांनी सदर रस्त्यावर पूर्व पश्चिम उत्तर दिशेने पत्रे लावून रस्ता बंद केला असल्यामुळे रहिवाशांना  बलसा रोड या मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही. 

त्यामुळे  जाय मोक्यावर येऊन बंद केलेला रस्ता वहिवाटीस व वाहतुकीस मोकळा करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील रहिवाशांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर रामराव डोंबे, अनिल राठोड, नामदेव जाधव, चंद्रकांत बहिरट, सखुबाई पवार, कल्पना राठोड, मधुकर आडे, अविनाश कडेल,मो.पाशा,मो.नूर, उमेश शर्मा, सुनील भोंबे, वसंत शिंदे,अक्षय जायभाये, शेख फारुख शेख फैजान, शेख हकीम शेख मेहबूब, शेख जुनेद शेख हकीम, गणेश कदम, बाळासाहेब पवार, मुक्तीराम अंभोरे, संजय मस्के, शेख रहीम शेख हुसेन, लक्ष्मण भदर्गे, शेख वसीम रहीम, आदींच्या सह्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या