💥 राज्यातील ‘पोलीस भरतीतील जाचक अट रद्द करा’ : आ.गोपीचंद पडळकरांची गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी....!


💥मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची दिलेल्या तारखेची अट रद्द करा’💥

‘पोलीस भरतीतील जाचक अट रद्द करा’; गोपीचंद पडळकरांची फडणवीस यांच्याकडे मागणी पोलीस भरती प्रक्रियेतील जाचक अटीत बदल करण्याची गोपीचंद पडळकरांची फडणवीसांकडे मागणी पोलीस भरती प्रक्रीयेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे या अटीतील तारखेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच प्रमाणपत्र सादर करणे हे उमेदवारांना अशक्य आहे यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. 

त्यामुळे तारखेची अट शिथिल करावी अशी मागणी भा.ज.पा.चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांचा विचार करता आपल्या मार्गदर्शनाखाली गृह विभागामार्फत मेगा पोलीस भरती होत आहे मात्र भरती करताना काही अटी जाचक ठरत आहे तरी बहुजन विद्यार्थ्याचा विचार करावा अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या