💥परभणी जिल्ह्यातल्या तृतीयपंथीयांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन....!


(फाईल चित्र)

💥जिल्हातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित गठीत💥 

परभणी,दि.18 नोव्हेंबर) : राज्यातील तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी व त्यांचे हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.  जिल्हातील तृतीयपंथी यांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित गठीत करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीव्दारे तृतीयपंथी यांना तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभाग, मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार परभणी जिल्हातील तृतीयपंथी यांनी तृतीयपंथीय व्यक्तीसाठी  http://transgender.dosje.gov.in/ राष्ट्रीय पोर्टलवर भेट देवुन ऑनलाईन अप्लाय करुन आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून तृतीयपंथी असल्याची आपली माहीती भरावी.

ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जसे की आधारकार्ड / मतदान/ओळखपत्र/पॅनकार्ड/ रेशनकार्ड इत्यादी कागपत्रे संलग्न करावीत. अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जायकवाडी वसाहत कारेगाव रोड, परभणी (दुरध्वनी क्र. 02452-220595) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या