💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुकान फोडली...!


💥टायरचे दुकान फोडून दिड लाख रुपयांचा मुद्देमाल तर गोळी-बिस्कीट दुकानातून तिस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली💥  

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दि 06/11 /2022 च्या मध्यरात्री चोरट्यांनी साखरा येथील नितीन टायर्सचे दुकानाचे लॉक तोडून त्यातील मोटरसायकल चे टायर चोरून नेले आहे अंदाजे 75 टायर्स चोरून नेले आहेत यात अपोलो MRF या सह नामांकित  कंपनीचे टायर्स चोरून नेले आहेत हि चोरी मध्यरात्री झाली असावी असा अंदाज ग्रामस्थाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

साखरा येथील नितीन पहारे यांनी  गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दुकानात टायर्सचा माल भरला होता मात्र चोरट्यांनी त्यावर लक्ष ठेवून दुकानाचे शटर तोडून माल चोरी केला आहे साखरा फाटा येथे नितीन पहारे यांचे पंचर चे दुकानं आहे या दुकानात हें टायर टूप देखिल विक्री करतात मात्र चोरट्यांनी काल मध्यरात्री दुकानातील सर्वच टायर व टूप  अंदाजे 1.50 एकलाख पन्नास हजार रुपयाचा माल चोरून नेला आहे  तर दुसरीकडे  प्रकाश भूतेकर यांच्या हरीश गोळी भंडार  दुकानातील काही सामना काही रोख रक्कम काही चिल्लर असे अंदाजे 30 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे आज सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाली"या  चोरी झालेल्या दुकानाची पाहणी करून   पंचनामा करण्यात आला आहे तसेंच साखरा फाट्यावरील काही सीसी टीव्ही फुटेज देखिल चेक करण्यात आले आहेत ह्या चोरी मुळे साखरा येथील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या