💥नांदेड येथील गुरुद्वारा तखत सचखंड गुरुद्वारात गुरु तेगबहादुरजी यांचा शहीदी दिवस साजरा...!


💥यावेळी तखत सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरु का खालसा संस्थेच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन💥 


नांदेड (दि.30 नोव्हेंबर) : गुरुद्वारा तखत सचखंड साहेब येथे "गुरु का खालसा" संस्थेच्या माध्यमाने दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शीख धर्माचे 9 वे गुरु, श्री गुरु तेगबहादुरजी यांचा शहीदी दिवस कार्यक्रम श्रद्धाभावाने पार पडला. यावेळी तखत सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरु का खालसा संस्थेच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

तखत साहेबचे माननीय जत्थेदार साहेब संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या प्रोत्साहनाने दि. 28 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा शहीदी दिवस निम्मित तखत साहेब ठिकाणी सायंकाळी 7.30 ते 10 वाजता दरम्यान सुखमनी साहेबचे पाठ आणि कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहीदी दिवस निमित्त दि. 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान रोज सुखमनी साहेबचे पाठ सुरु होते त्यांचे समापन करण्यात आले. प्रसंगी ज्ञानी सरबजीतसिंघ निर्मले यांनी गुरु तेगबहादुर यांच्या जीवनावर आधारित कथा सांगितली. सन 1675 मध्ये काश्मीरी पण्डितांच्या रक्षणार्थ दिल्लीत गुरु तेगबहादुर यांना तत्कालीन मोघल साम्राज्याने हौतात्म्य केले होते. वरील इतिहासाविषयी अरदास करण्यात आली. तसेच लंगर प्रसाद कार्यक्रम झाले. यावेळी दक्षिण मध्य रेलवेचे विभागीय प्रबंधक उपेंद्रसिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे सहायक अधीक्षक हरजीतसिंघ कडेवाले, 

' गुरु का खालसा संस्थेचे "अध्यक्ष कश्मीरसिंघ भट्टी, जसबीर सिंघ लिखारी, त्रिलोचनसिंघ सोहल,सुरजीतसिंघ खालसा, प्रीतम सिंघ हरियाणावाले सुखदेवसिंघ भट्टी,भूपेंद्रसिंघ कापसे सह मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या