💥परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तळागातील पत्रकारांना न्याय मिळण्याची अपेक्षा बळावली....!


💥मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार हट्टेकर कार्याध्यक्षपदी प्रभू दिपके यांची निवड💥

💥प्रदेश प्रतिनिधीपदी मानोलीकर महिला जिल्हा संघटकपदी अरूणा शर्मा तर डिजिटल मिडिया प्रमुखपदी शेख ईफ्तेकार यांची निवड💥

परभणी, (प्रतिनिधी) - मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्षपदी प्रभू दिपके, प्रेदश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तेकार व जिल्हा संघटक अरूणा शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या तळागाळातील पत्रकारांना न्याय मिळण्याची अपेक्षा बळावली असून पत्रकार क्षेत्रातील भेदभाव प्रवृत्ती संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जिल्हा मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यासाठी वसमत रोड येथील हॉटेल मालगुडी जंक्शन येथे दि.8 नोव्हेबर रोजी दुपारी  कार्यकारीणीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य निवडणुक  प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे हे होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून साहित्यीक तथ्लृा पत्रकार आसाराम लोमटे, प्रविण देशपांडे उपस्थित होते. 

या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी राजकुमार हट्टेकर यांची निवड करण्यात आली. तसेच उर्वरीत कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्ष पदी प्रभू दिपके, प्रदेश प्रतिनिधीपदी लक्ष्मण मानोलीकर, डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्षपदी शेख इत्फेखार व जिल्हा संघटक म्हणून अरूणा शर्मा यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हाउपाध्यक्ष पदी मोहन धारासुरकर, धाराजी भुसारे, जिंतूर चे एम.ए. माजीद,सेलू येथील लक्ष्मण बागल,सोनपेठ येथील शिवमल्हार वाघे, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, प्रसिध्दी प्रमुख मोईन खान, कोषाध्यक्ष सुरेंद्र पाथ्लृरीकर, सरचिटणीस लक्ष्मीकांत बनसोडे, डिजीटल मिडीया जिल्हाप्रमुख शेख ईफ्तेखार, कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव वडकुते, माणिक रासवे, शिवशंकर सोनुने, सुधाकर श्रीखंडे, दिलीप बोरुळकर,  माणिक शिंदे, आदीची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय घनसावंत, सुनिल सुतारे, विजय कदम आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या