💥पूर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहन मोरे यांच्या घरी धाडसी चोरी....!


💥अज्ञात चोरट्यांनी पळवला ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल💥

पूर्णा (दि.०६ नोव्हेंबर) - शहरातील अत्यंत गजबलेली व उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महावीर नगर परिसरातील माजी नगराध्यक्ष मोहन मोरे यांच्या राहत्या घरी दि.३० आक्टोंबर ते काल शुक्रवार दि.०५ नोव्हेंबर २०२२ च्या मध्यरात्री धाडसी चोरी झाल्यामुळे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील माजी नगराध्यक्ष तथा शिक्षण संस्था चालक मोहन मोरे यांच्या राहत्या घरी दि.३० आक्टोंबर ते काल शुक्रवार दि.०५ नोव्हेंबर २०२२ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला प्रवेश करून घरातील कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रकमेसह जवळपास ९ लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याचे आढळून आले आहे दरम्यान चोरी झाल्याची माहिती होताच घटनास्थळाला पूर्ण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली पंचनामा केला दरम्यान शनिवारी दिवसभर एवढ्या मोठ्या झालेल्या चोरीची पूर्ण शहरामध्ये चर्चा होती तर त्यांना जर बंद करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हानास उभी राहिली असून लाखो रुपये सोन्या-चांदीचे दागिने व प्रकल्प झाल्यामुळे पूर्ण शहरांमध्ये भेटीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान मागील काही दिवसापासून पूर्ण शहरांमध्ये खून दरोडे वाटणाऱ्या या गुन्हेगारी मध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष जबाबदार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता एवढ्या मोठ्या चोरीचे प्रकरण पोलिसांना कसे आव्हानात्मक बनले आहे याची चर्चा शनिवारी दिवसभर पूर्ण शहरांमध्ये होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या