💥चारठाणा सांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन....!


💥सांस्कृतिक महोत्सवाचे गोकुळेश्वर मंदिर परिसरात जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले💥


परभणी (दि.24 नोव्हेंबर) : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त राज्य पुरातत्व विभाग आणि देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चारठाणा सांस्कृतिक महोत्सवाचे गोकुळेश्वर मंदिर परिसरात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले.


उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार मांडवगडे, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक अमोल गोटे, पुरातत्त्व सहायक मयुरेश खडके, ऐतिहासिक वारसा गटाचे सदस्य तथा माहिती विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर आणि चारठाण्याचे सरपंच अनिरुद्ध राऊत यावेळी उपस्थित होते.

  चारठाणा येथील पुरातत्वीय इतिहास सर्वांना प्रेरणादायी असून, येथील जागतिक पुरातत्वीय वारसा स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. येथे तितकी क्षमता असून, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची माहिती संकलित केली आहे. यामुळे जागतिक वारसास्थळांची पुढील पिढीला माहिती होणार आहे. त्याची माहिती राज्य शासनाला देण्यात येईल. त्यामुळे येथील वारसास्थळाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. येथील नागरिकांनी लोकचळवळीच्या माध्यमातून हा वारसा जपला आहे, त्याचे संरक्षण करण्यात सर्वांचा हातभार लागतो आहे, ही आनंदाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.

    ऐतिहासिक वारसा स्थळांची देखभाल या विषयावर बोलताना चारठाणा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन अल्पावधीत करण्यात आले. येथील ऐतिहासिक वारशाची देखभाल करणे एकट्या विभागाचे काम नसून गावक-यांनी हातभार लावला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला असून, अशाच पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास ऐतिहासिक वारशांची उत्तम देखभाल करता येईल. या कामी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभेल, असा विश्वास राज्य पुरातत्व विभागाचे संचालक अमोल गोटे यांनी व्यक्त केला.

चारठाणा येथील जागतिक वारसा स्थळाची नव्या पिढीला माहिती व्हावी, त्यातून येथील स्थळांचा प्रसार व्हावा आणि पर्यटकांचा इकडे येण्याकडे कल वाढावा, यासाठी आयोजन करण्यात आले असल्याचे प्रास्ताविकातून कामाजी डक यांनी सांगितले. हेरिटेज वॉक अंतर्गत गावातील प्राचीन मंदिरांना मान्यवरांनी भेट दिली. तसेच ऐतिहासिक वारसा गटाचे सदस्य तथा माहिती विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांनी रेखाटलेल्या वारसा स्थळांच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

  परभणी जिल्ह्यातील गावागावातून ऐतिहासिक वारसा संगोपन व संवर्धनासाठी गेली पाच वर्षे झटणाऱ्या  कार्यकर्त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ऐतिहासिक वारसा स्थळांची देखभाल या विषयावर मयुरेश खडके यांनी मार्गदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या