💥दिपावली सणा निमित्त नरसिंह प्रतिष्ठान तर्फे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन....!


💥या कार्यक्रमाचे आयोजन दि.८ नोव्हेंबर रोजी चिंतामणी पार्क जिंतूर येथे दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले आहे💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर शहरातील दीपावली निमित्त खास महिलांसाठी श्री नृसिंह प्रतिष्ठानच्यावतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ८ नोव्हेंबर 2022 रोजी चिंतामणी पार्क जव्हार विद्यालय रोड या ठिकाणी मंगळवार दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत करण्यात आले असून, या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहे. यासाठी सर्व महिलांनी यात सहभाग नोंदवून घ्यावा असे आव्हान श्री नृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्षा प्रेक्षाताई विजयराव भांबळे (बोराडे) यांनी केले आहे.


या कार्यक्रमातून खास महिलांसाठी खेळातून मनोरंजन , मनोरंजनातून खेळ तर द्या स्वतःसाठी वेळ म्हणून होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि विविध स्पर्धा होणार असून यात विजेत्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मिक्सर, डिनर सेट, व पैठणी ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत नोंदणी केलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

तसेच दिनांक 9 सप्टेंबर 22 वार बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या वतीने दीपावली निमित्त सर्व नागरिकांना स्नेह मिलन व संगीत आर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान श्री नृसिंह प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे (बोराडे) यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या