💥पुर्णा तालुक्यातील मौ.कावलगाव येथे स्त्री शक्ती सन्मान सोहळा संपन्न...!


💥मेळाव्यास गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकररावजी गुट्टे यांनी उपस्थित राहून स्त्रियांचा सन्मान केला💥


पुर्णा (दि.२० नोव्हेंबर) - तालुक्यातील मौजे कावलगाव येथे महिला सबलीकरणासाठी आयोजित केलेल्या स्त्री शक्ती सन्मान सोहळा व वंचित लाभार्थ्यांचा जाहीर मेळाव्यास गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी उपस्थित राहून स्त्रियांचा सन्मान केला. कोरोना संक्रमण कालावधीत  कुटुंब,समाज सावरणाऱ्या या स्त्रियांना भेटून आणि संवाद साधून खूप छान वाटले.यावेळी पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, सुभाषराव देसाई (प्रभारी, पुर्णा), बापुराव डुकरे (तालुका उपाध्यक्ष), जगन्नाथ रेनगडेर (रासप तालुकाध्यक्ष), नारायणराव पिसाळ, सरपंच उज्वलाताई पिसाळ, बळीरामजी कदम, बालव्याख्याती भाग्यश्री मोहिते, हबीब पठाण, बळीरामजी कदम, विकास घाते,उपसरपंच श्रीकांत कदम, नारायण मोरे, ग्रामसेवक पापटवार मॅडम, विश्वनाथ होळकर, ग्रा.प.सदस्य सोपानराव कदम, गिताराम देसाई, नाना बुध्दे (सरपंच, निळा),आकाश आहिरे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या