💥परभणीत कायदेविषयक जनजागृती महाशिबिर संपन्न : अनेक लाभार्थ्यांनी घेतला लाभ....!


💥या महाशिबिराचे आयोजन आज श्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते💥

परभणी (दि.10 नोव्हेंबर) : कायदेविषयक जनजागृती आणि शासकीय विविध कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती होण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांच्या निर्देशान्वये 'सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियान' निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या महाशिबिराचे आयोजन आज श्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. यु. एम. नंदेश्वर यांची उपस्थिती होती. महाशिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सुद गोयल यांनी केले. तर प्रमुख अतिथी पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांची उपस्थिती होती.


महाशिबिरामध्ये मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा 117 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या शिबिराला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. शिबिरात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, कामगार अधिकारी, सरकारी कामगार कार्यालय, अधीक्षक, पोस्ट ऑफिस, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय, भारतीय स्टेट बैंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी या कार्यालयांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँड. जीवन पेडगांवकर व आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. जी. लांडगे यांनी मानले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या