💥परभणी जिल्हा शासकीय महिला रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कडून पाहणी....!


💥रुग्णालय बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी गुणवत्ता चाचणी समितीची स्थापना करण्याच्या दिल्या सूचना💥


परभणी (दि.०७ नोव्हेंबर) : शासकीय जिल्हा महिला रुग्णालयातील माता बाल संगोपन रुग्णालयाच्या निर्माणाधीन इमारत बांधकामाची जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज प्रत्यक्ष बांधकामस्थळी जावून पाहणी करत संबंधितांना बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बन, वैद्यकीय अधीक्षक डॉ.के.बी.चौधरी,बालरोगतज्ज्ञ डॉ.विशाल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम आणि डॉ. किशोर सुरवसे आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या या रुग्णालयाचे बांधकाम हे गुणवत्तापूर्ण झाले पाहीजे. रुग्णालय बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी गुणवत्ता चाचणी समितीची स्थापना करण्याच्या सूचना श्रीमती गोयल यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच आठवडाभरात झालेल्या आणि प्रलंबित कामांचा लेखी अहवाल दर सोमवारी देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आगप्रतिबंधक उपाययोजना, विद्युतजोडणी, आवश्यक पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामाची पाहणी केली. रुग्णांच्या सेवेत हे रुग्णालय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक-एका माळ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. प्रलंबित कामांची यादी तयार करून ती निर्धारित वेळेत पूर्ण करा. इमारत परिसरातील पार्किंग, पदपथ, पथदिवे, मलनिस्सारण वाहिनी, स्वयंपाकगृह, दक्षता विभाग, अतिदक्षता विभागातील खाटांची जागा आणि दर्जा, स्तनपान विभागात लागणारे फर्निचर, सौरऊर्जा जोडणीबाबत त्यांनी संबंधितांकडून आढावा घेतला. 

रुग्णालयाच्या निर्माणाधीन इमारत परिसरातील पावसाच्या पाण्याचे जलपुर्नभरण, उद् वाहन आदी कामे येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या