💥अंगणवाडी महिला कर्मचारीऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले निवेदन....!


💥बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्हा दौऱ्यावर आले असता दिले निवेदन💥

✍️ मोहन चौकेकर                             

चिखली :- भारतातील संपूर्ण राज्यात 00 ते 06 वर्ष वयोगटातील बालकां करिता  शासनाच्या महिला व बालकल्याण विभागा मार्फत  अंगणवाडी  व मिनी अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात. ह्या अंगणवाडी केंद्रात बालकांना पूर्व शालेय शिक्षण, बालसंगोपन, लसीकरण शिबीर सकस आहार वाटप गरोदर माता,स्तनदा माता, किशोर वयीन मुलीना मार्गदर्शन या सारखे अनेक महत्त्वाचे उपक्रम  राबवावे लागतात.त्या तुलनेत अंगणवाडी कर्मचारी यांना अतिशय कमी मानधनावर काम करावे लागते. 

तसे कामाचे स्वरुप बघितले तर महागाई च्या तुलनेत यांना खूप कमी मानधन मिळते अनेक राज्यात अंगणवाडी कर्मचारी यांना रुपये 22000/-एवढे मानधन मिळते त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा एवढे मानधन मिळावे तसेच सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे आम्हाला सुद्धा वेतन श्रेणी लागु करावी व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी मिळावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प चिखलीच्या सौ. उज्ज्वला खंडारे, जयश्री चव्हाण , रंजना कोमुदे, सरिता पवार, स्वाती खरात, अनिता भंडारे ,पुष्पा खरात शैला उबरहांडे , निर्मला केवट,सुनीता घट्टे , छाया पसरटे,अनिता शिंदे,ज्योती सदार,ज्योती साळवे, रेश्मा खान, शाहीना मॅडम,शीला जाधव, उज्ज्वला पवार, आशा वानखेडे,  मंगला वैरी , अश्विनी शितोळे,साधना मगर, मंगला मोरे,मंदा बनकर , नीता कदम, आशा खुणारे ,बाली अवसरमोल,जयश्री मातकर आशालता चुनावाले,कटोरे,  शबाना ,जयश्री शिरसाट ,उषा साळवे, दुर्गा परसने, अंजली थोरात, भंडारे अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने दिनांक 09.11.2022 वार बुधवारला बुलडाणा जिल्हय़ाचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांना  जिल्हा दौऱ्यावर आले असता दिले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अंगणवाडी कर्मचारी यांना तुमच्या मागण्यां लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले..... 

✍️ मोहन चौकेकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या