💥महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकींच्या कर्तव्य तत्परतेमुळे हरवलेला मुक मुलगा मिळाला वावळे कुटुंबाला....!


💥पुर्णा पोलिस स्थानकात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी नसरीन सिध्दीकींचे होत आहे सर्वस्तरातून कौतुक💥


 
पुर्णा : पुर्णा पोलिस स्थानकात कार्यरत कर्तव्यदक्ष महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकी या दि.१६ नोव्हेंबर २०२२२ रोजी दुपारच्या सुमारास शहरातील महाविर नगर परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यास गेल्या असतांना त्यांना एटीएम जवळ एक अंदाजे १० वर्षे वयाचा मुलगा रडतांना त्यांना आढळून आला यावेळी सामाजिक बांधिलकीसह आपल्या कर्तव्याचे भान जोपासत त्यांनी त्या मुलाची अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली असता त्यांना असे निदर्शनास आले की तो मुलगा मुका असल्यामुळे तो बोलू शकत नाही.

यावेळी क्षणाचाही विलंब नकरता महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकी यांनी त्या मुक्या मुलास पोलिस स्थानकात आणून कर्तव्यतत्परता दाखवत सदरील मुलगा त्याच्या कुटुंबाला कसा मिळेल या दृष्टीने पावल उचलत महाबोधी न्युज चॅनलने पत्रकार प्रदिप नन्नवरे यांच्याशी संपर्क साधला व मुलाच्या फोटोसह पोस्ट व्हायरल करण्यास सांगितली यावेळी महाबोधी न्युज चॅनलच्या माध्यमातून नन्नवरे यांनी पोस्ट वायरल केल्या मुळे अवघ्या २० मिनिटात त्या मुक्या मुलाच्या कुटुंबाशी संपर्क झाला व सदरचा मुलगा हा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील राहणारे ॲड.किसन वावळे यांचा मुलगा असल्याचे समजले यावेळी मुलाच्या आजीबाई पोलिस स्थानकात आल्यानंतर त्या मुलास कर्तव्यदक्ष महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकी व महाबोधी न्युजचे पत्रकार प्रदिप नन्नवरे यांनी त्या मुलास आजीच्या स्वाधीन केले.

कर्तव्यदक्ष महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकी यांच्या कर्तव्यतत्परते मुळे वावळे कुटुंबाला आपला हरवलेला मुलगा मिळाल्यामुळे वावळे कुटुंबाने नसरीन मोहम्मद सिद्दीकी यांचे आभार व्यक्त केले असून कर्तव्यदक्ष महिला पोलिस कर्मचारी नसरीन मोहम्मद सिद्दीकी यांच्या कर्तव्यतत्परतेचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या