💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील अग्निवीर म्हणून नियुक्ती झालेल्या जवानाचा जिल्हा परिषद शाळेत सत्कार....!


💥महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून अग्निवीर जवान आदिनाथ जयवंतराव बोकारे व त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार💥


पुर्णा (दि.२९ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी,शास्त्रज्ञ जॉन वेस्ले हयात यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून देशातील सैन्यदलात अग्निवीर म्हणून नवनियुक्त झालेले सैनिक आदिनाथ जयवंतराव बोकारे व त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर बोकारे,मा.अध्यक्ष गंगाधर बोकारे,सदस्य रमेश बोकारे,मारोती बोकारे,जनार्धन बोकारे,गंगाधर बोकारे, बंडुभाऊ बोकारे, त्र्यंबकराव बोकारे,श्री अंकुश बोकारे,श्री सुभाष बोकारे,श्री पांडुरंग बोकारे,नागेश सावंत,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार सर,भागवत शिंदे सर,श्री आबनराव पारवे सर व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी इयत्ता सहावी वर्गात शिकणाऱ्या पूर्वी बोकारे,मोहिनी बोकारे,रोहिणी बोकारे व ऋतुजा आगलावे या विद्यार्थिनींनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत शिंदे सर यांनी केले यावेळी अग्निवीर जवान आदिनाथने सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांना सांगितले की,खुप अभ्यास करावा,भरपूर मेहनत करावी तरच आपण यशस्वी होऊ शकतो.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला यावेळी विलास बोकारे सर यांनी शास्त्रज्ञ जॉन वेस्ले हयात यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तर श्री आबनराव पारवे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपण जीवनात आत्मसात करावे असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी पूर्वी बोकारे हिने अगदी अस्खलितपणे केले अध्यक्षीय समारोप गोविंद नलबलवार सर यांनी केला तर आभार प्रदर्शन इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी मोहिनी बोकारे हिने केले कार्यक्रम अगदी छान प्रकारे संपन्न झाला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या