💥परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल करणार उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांची तपासणी....!


💥उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामुग्री खरेदी करुन आरोग्य सुविधांची तपासणी जिल्हाधिकारी गोयल करणार💥

परभणी (दि.15 नोव्हेंबर) : कोव्हिड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तसेच भविष्यात तालुका स्तरावरील वैद्यकीय निकड विचारात घेवून वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच सोनपेठ, पाथरी, मानवत, पालम, पूर्णा, जिंतूर व बोरी येथील ग्रामीण रुग्णालय, परभणी शहरातील स्त्री रुग्णालय व अस्थिव्यंग रुग्णालयासाठी कोव्हीड-19 ची पार्श्वभूमी विचारात घेवून आवश्यक त्या वैद्यकीय साहित्य सामुग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत निधी प्रदान करण्यात आला आहे. यानुसार उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामुग्री खरेदी करुन आरोग्य सुविधांची तपासणी जिल्हाधिकारी आंचल गोयल या करणार आहेत.  

या निधीतून उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य सामुग्री खरेदी करुन रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय परभणी यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय व अस्थिव्यंग रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याचा रुग्णांकरीता पुरेसा वापर होत आहे किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष मुल्यमापन व तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल या संबंधीत रुग्णालयास खालील तारखेस प्रत्यक्ष भेट देवून तपासणी करणार आहे. श्रीमती गोयल या मंगळवार, दि. 22 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वा. ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे भेट देवून तपासणी करणार आहेत. तर दुपारी 1 वाजता ग्रामीण रुग्णालय, पाथरी व सायंकाळी 4 वाजता ग्रामीण रुग्णालय, मानवत येथे भेट देणार आहेत. बुधवार, दि. 22 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड, तर दुपारी 1 वाजता  ग्रामीण रुग्णालय, पालम,  गुरुवार, दि. 24 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय, सेलू तर दुपारी 1 वाजता ग्रामीण रुग्णालय, जिंतूर व सायंकाळी 4 वाजता जिंतूर तालूक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालय, शुक्रवार दि.25 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय, पूर्णा तर दुपारी 2 वाजता स्त्री रुग्णालय, परभणी आणि  सायंकाळी 4 वाजता अस्थिव्यंग रुग्णालय, परभणी येथे भेट देवून पाहणी करणार आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या