💥गोदाकाठचा कृषीसाधक कै.दादा पवार यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमीत्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप....!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनुरथ आवरगंड हे होते💥

पुर्णा (दि.17 नोव्हेंबर) - तालुक्यातील माखणी येथे आज गुरूवार दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै.गंगाधरराव पवार (दादा पवार) गोदाकाठचा कृषिसाधक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमीत्त माखणी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.अनुरथ आवरगंड तर प्रमुख पाहुणे म्हणून   मारोती अण्णा मोहिते(डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ तालुकाप्रमुख),पशुपती शिराळे उपसरपंच फुलकळस ग्रामपंचायत यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष श्री.शिवाजी आवरगंड, समितीचे उपाध्यक्ष बंडू गाडे शिक्षणप्रेमी नागरिक श्री.चांदाजी आवरगंड. अंगद आवरगंड, भानुदास आवरगंड या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचलला ते जनार्धन आवरगंड यांची उपस्थिती होती.शालेय व्यवस्थापन समितीच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सुरूवातीला कै.दादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजयकुमार जोशी सर यांनी केले .त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या घेतलेल्या विविध स्पर्धेत त्यांनी प्रथम ,द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांना शेक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याचा नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या शेक्षणिक जिवनात उपयोग होणार आहे.असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुण्यामध्ये श्री.मारोती अण्णा मोहिते व पशुपती शिराळे यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळातर्फे 10 होतकरू विद्यार्थ्यांना पुढील वर्षभरासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प केला.कै.दादा पवार यांच्या जिवनचरित्रावर जनार्धन आवरगंड यांनी प्रकाश टाकला. त्यांनी शेतक-यासाठी करत असलेल्या कामाचा उल्लेख केला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थीनी तेजस्विनी आवरगंड हिने आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर स्पर्धेत प्रथम,द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन पवार यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल शेळके सर,सौ.ज्योती झटे मँडम यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या