💥डॉ.दिगंबर पटाईत व प्रगतशिल शेतकरी पंडित थोरात यांची अभ्यास मंडळावर नियुक्ती....!


💥अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्या बदल सर्व शेतकऱ्यांकडून त्यांचे आभिनंदन होत आहे💥

पुर्णा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभागाच्या अभ्यास मंडळावर डॉ.दिगंबर पटाईत, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ आणि श्री. पंडित थोरात, प्रगतशील शेतकरी यांची सदस्य म्हणून विद्यापीठाने नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी आहे.


याकरिता सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभागाने आज दि.२५.११.२०२२ रोजी विभागात सन्मानीय सदस्यांच्या स्वागतासाठी आणि विविध विषयावरील चर्चेसाठी बैठक आयोजित केली होते प्रथमतः सन्मानीय सदस्यांचे विभागाद्वारे अभिनंदन करून यथोचित स्वागत करण्यात आले. बैठकीमध्ये अभ्यास मंडळाचे सचिव डॉ. विद्यानंद मनवर यांनी मागील बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय स्पष्ट केले तदनंतर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शंकर गणपत पुरी यांनी विभागाची तसेच महाविद्यालयाची सविस्तर माहिती सन्मानीय सदस्यांना देवून विभागाद्वारे पुढील सहा महिन्यात घेण्यात येणारे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्य नमूद केले. डॉ.दिगंबर पटाईत यांचे कीटकशास्त्रातील सखोल ज्ञान आणि त्यांचा शेतक-यांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क तसेच प्रगतशील शेतकरी श्री. पंडित थोरात हे प्रयोगशील, सतत नाविन्य उपक्रमशील आणि शेतकरी समूहामध्ये लोकप्रिय असल्याने या दोन ही सन्मानीय सदस्यांची विभागातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्यास तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विस्तार कार्य प्रभावी राबविण्याकरिता मोलाचे सहकार्य मिळेल असा विश्वास डॉ. शंकर पुरी यांनी व्यक्त केला.

बैठकीमध्ये शैक्षणिक आणि विस्तार कार्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयास विध्यार्थ्याच्या भेटी आयोजित कराव्यात असे डॉ.दिगंबर पटाईत यांनी सूचित केले तर शेतक-यांना उद्योगाभिमुख बनविण्यासाठी विभागाद्वारे विविध विस्तार कार्यक्रम आखण्याचे श्री. पंडित थोरात यांनी सुचविले. दोघाचे ही स्वागत शेतकरी वर्गातुन होत आहे रमेशराव गोळेगाकर  रमेश राउत प्रकाश हरकळ जनार्धन आवरगंड मधुकर जोगदंड रमेश पवार मंगेश देशमुख नामदेव कोकर पठाण मोबीन गोवींद दुधाटे शुरेश शृंगार पुतळे केशव पारवे सीळवने सर आदी शेतकऱ्यानी अभिनंदन केले शेवटी अभ्यास मंडळाचे सचिव डॉ. विद्यानंद मनवर यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या