💥मुदतीत माहिती न दिल्यामुळे ग्रामसेवकाला दहा हजार रुपयांचा दंड....!


💥ग्रामसेवकास 10 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले💥

जिंतूर प्रतिनिधी  बि.डी.रामपूरकर

माहिती अधिकारात अर्जदाराला मुदतीत माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे जिंतूर तालुक्यातील मानमोडी च्या ग्रामसेवकास 10 हजार रुपये दंड भरण्याची आदेश राज्य माहिती आयोगाने दिले आहेत.

जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील किशन आढे यांनी मानमोडी येथील ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाकडे एका स्टोन क्रेशर संबंधी ना हरकत बाबत माहिती अधिकारात माहिती मागवली होतीसंबंधी ना हरकत बाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती परंतु सदरील ग्रामसेवकाने मुदतीत माहिती दिली नसल्याने मुळे अर्जदाराने सुरुवातीला आपली अधिकाऱ्याकडे अपील केले होते मात्र त्यांच्याकडूनही माहिती उपलब्ध झाली नाही त्यानंतर किशन आढे यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे अपील केली दरम्यान खंडपीठाने दोन वेळेस ग्रामसेवकला सादर करण्याचे आदेश दिले असतानाही मात्र संबंधित जन माहिती अधिकारी तथा  ग्रामसेवकाने खुलासा सादर केला नाही आयोगाचा निर्णय व निर्देशांक कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केली यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 (1) चा अभंग झाला संबंधित ग्रामसेवक तथा जिल्हा माहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने 10 हजार रुपयांचा दंड फुटवला असून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत दंड वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या