💥संविधानाचे रक्षण करण्यासाठी राजगृहाच्या पाठीशी उभे रहा - विजय वाकोडे


💥पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित रिपब्लिकन सेनेच्या वर्धापण दिन सोहळ्यात ते बोलत होते💥


पूर्णा (दि.३० नोव्हेंबर) - या देशात संविधान बदलण्याचे कट कारस्थान चालू असुन सविधान विरोधी धोरण राबविल्या जात असल्यामुळे संविधान धोक्यात येत असल्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यासाठी राजगृहाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे यानी केले यावेळी किरण घोगडे बाबा साहेबाच्या निळ्या झेंड्या खाली एकत्र येण्याचे आवाहन केले यशवंत भालेराव यांनी रिपब्लिकन सेने मध्ये जास्तीत जास्त तरुणानी सहभागी होण्याचे तर भन्ते पंयाबोधी यांनी २०२४ निवडणूकी पूर्वी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन केले.


पुर्णा शहरातील आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आज बुधवार दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०४-०० वाजेच्या सुमारास आयोजित रिपब्लिकन सेनेच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या निमिताने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील महिला,आरोग्य अधिकारी/कर्मचारी,महिला बचत गट सदस्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. 


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भालेराव तर उद्घाटक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे मराठवाडा युवा अध्यक्ष अशिष वाकोडे प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते पंयाबोधी थेरो,सय्यद साबेर औरगाबाद नांदेड पश्चिम जिल्हाध्यक्ष ॲड.मारोती सोनकांबळे,राहुल चिखलीकर,किरण मानवतकर,ॲड.विनय भवरे,ॲड.सोमनाथ नागठाणे,प्रकाश नवरे,कैलास जोंधळे,अंकुश सावते,गणेश आवचार,ॲड.आर.एम गरुड,माधव चिते,महेबूब कुरेशी,बौद्धाचार्य तुकाराम ढगे,त्र्यंबक कांबळे,उमेश बऱ्हाटे आदी उपस्थित होते.


या निमिताने शाहीर चंद्रकात दुधमल व शाहीर दिनकर लोणकर याच्या संगीत रजनी गीत गायनाचा कार्यक्रम सपन्न झाला भबुद्ध डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प सर्मपण करून अभिवादन करण्यात आले त्या नंतर त्रिशरण पचशिल ग्रहण करण्यात संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले प्रमुख उपस्थित स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक राजकुमार सुर्यवंशी यानी स्वागत करण्यात आले या निमिताने मान्यवरांनी विचार मांडले या नंतर सत्कार मूर्तीचा प्रशस्ती पुष्पगुच्छा देवून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृत कऱ्हाळे आभार सारनाथ जोधळे कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल पुंडगे चंद्रमणी लोखंडे सूर्यकात रायभोळे प्रेमानंद ढगे आनद कनकुटे विशाल खंदारे शोभा बाई डोंगरे पंचशिल वाघमारे रेखा काबळे वैशाली गायकवाड मिना चोपड अश्विनी वाघमारे नादिनी प्रयत केले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या