💥टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणी अखेर कारचालक महिलेवर गुन्हा दाखल.....!


💥हलगर्जीपणा तसेच बेदरकारपणे वाहन चालवण्याशी संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला💥

पालघर – टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे या प्रकरणात दोन महिन्यांनी पालघर पोलिसांनी डॉ.अनाहिता पंडोल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघात झाला तेव्हा त्या कार चालवत होत्या.

हलगर्जीपणा तसेच बेदरकारपणे वाहन चालवण्याशी संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुर्घटना घडली तेव्हा पंडोल यांचे पती डेरियस आणि डेरियस यांचे बंधु जहांगीरही कारमध्ये होते. सायरस यांच्यासह जहांगीर यांचाही मृत्यू झाला असून अनाहिता आणि त्यांचे पती गंभीर जखमी झाले होते डेरियस यांना काही दिवसांपूर्वीच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे व पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे मात्र अनाहिता यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. अनाहिता यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या