💥परभणीत संविधान दिनानिमित्त उद्या 26 नोव्हेंबर रोजी रॅलीचे आयोजन...!


💥संविधान दिनानिमित्त उद्या सकाळी साडेआठ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन💥

परभणी (दि. 25 नोव्हेंबर) : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त उद्या (दि. 26) सकाळी साडेआठ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, पोलिस अधीक्षक श्रीमती आर.रागसुधा यांची या रॅलीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संविधान दिनानिमित्त उद्या सकाळी साडेआठ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यक्रमस्थळापासून वसंतराव नाईक यांचा पुतळा, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

परभणी येथील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा या रॅलीमध्ये सहभाग राहणार असून,  नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या