💥परभणीत सुशिक्षित बेरोजगारांसाठी शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा....!


💥मेळाव्यात युवक-युवतींनी  सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहा.आयुक्त खंदारे यांनी केले💥

परभणी (दि. 22 नोव्हेंबर) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी (दि. 26) सकाळी साडेनऊ वाजता प्रधानमंत्री कौशल्य केंद्र पॉलिटेक्निक वर्कशॉप श्री शिवाजी महाविद्यालय परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित कंपनीतील उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून सदर रोजगार मेळाव्यामध्ये युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे.  

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८९०८२८७९७, ९८६००१५३८३ आणि ९६२३०२०९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या