💥चारठाणा जिल्हा परिषद शाळेतील 1982 च्या वर्ग मित्रांनी तब्बल 40 वर्षानंतर जुन्या आठवणींना दिला उजाळा.....!


💥या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रामपूरकर यांनी केले💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.२१ नोव्हेंबर) - चारठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता दहावीच्या 1982 मधील विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन जिंतूर येथे हॉटेल स्वागत या ठिकाणी घेण्यात आले.

या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बि.डी. रामपूरकर हे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक, प्राध्यापक ,डॉक्टर ,व्यापारी, विविध शासकीय कर्मचारी व व्यापारी वर्गमित्र तब्बल 40 वर्षानंतर एकत्र आले होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रामपूरकर यांनी केले. तसेच सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आपापला थोडक्यात परिचय देऊन आज पर्यंत कसे स्ट्रगल केले व शाळेतील गोड व कडू आठवणींना उजाळा दिल्यामुळे सर्वजण हास्य कल्लोळात रमून गेलेले दिसत होते.

याप्रसंगी वर्गमित्र बाळासाहेब रामपूरकर जिंतूर, विजय हिरो जिंतूर, राजदत्त पार्डीकर वसमत, माणिक रथकर औरंगाबाद, डॉक्टर हरी पाटोडे नांदेड, गणपत प्रताप राठोड सोनापूर डॉक्टर मुंजा हावळे सेलू, अशोक गीते चारठाणा, सौ. रोहिणी सोनवटकर (देशपांडे) औरंगाबाद, उमाकांत इंगळे मंठा, ज्ञानेश्वर खंदारे औरंगाबाद, गणपत राऊत चारठाणा, विलास आघाव वाई चारठाणा, यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित राहून स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या