💥परभणीत विधीसेवा महाशिबिर, शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा गुरुवार दि.10 नोव्हेंबर रोजी.....!


💥शहरातील श्रीमंगल कार्यालयात विधी सेवा महाशिबिर शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचे आयोजन💥 

परभणी (दि.07 नोव्हेंबर) : नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. यू. एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.10) सकाळी 10 वाजता श्रीमंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे विधी सेवा महाशिबिर शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

   नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येथे होणा-या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागामार्फत माहितीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घेत विविध विभागामार्फत दिल्या जाणा-या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. जी. लांडगे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या