💥भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ 'नफरत छोडो,संविधान जोडो' यात्रा सोमवार दि.07 नोव्हेंबर रोजी परभणीत...!


💥या यात्रेचे नेतृत्व डॉ.भालचंद्र मुणगेकर, साथी सुभाष लोमटे व ललीत बाबर हे करीत आहेत💥

परभणी (दि.05 नोव्हेंबर) - भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कोल्हापूर ते नांदेड दरम्यान "नफरत छोडो, संविधान जोडो" यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दि.02 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून सुरु झालेली ही यात्रा सोमवार दि.07 नोव्हेंबर 2022 रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. या यात्रेचे नेतृत्व डॉ.भालचंद्र मुणगेकर, साथी सुभाष लोमटे व ललीत बाबर हे करीत आहेत. 

सोमवारी दुपारी 03-00 वाजता गंगाखेड नाका येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अण्णा भाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील मुख्य मार्गाने तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या तिरंगा मार्चचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेने योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यात्रा समन्वयक व स्वागत समितीद्वारे करण्यात आले आहे. स्वागताची तयारी करण्यासाठी अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, डॉ. सुनील जाधव, नदीम इनामदार, गोविंद गिरी, कीर्तीकुमार बुरांडे, आप्पाराव मोरताटे, नितीन सावंत, एन.आय. काळे, मिठ्ठूभाई, सय्यद रफीक, शिवाजी कदम, अब्दुल भाई, गजानन जोगदंड, सलीम इनामदार, शेख रफिक, डॉ. गोविंद कामटे, सारंग साळवी, प्राचार्य घुले, यशवंत मकरंद, प्रल्हाद मोरे, प्रसाद गोरे, नितीन लोहट, ज्ञानोबा मुंढे, त्रिपाठी, डॉ. प्रमोद जगताप, साजेद बेलदार, गायकवाड, जयश्री पुंडगे, अझहर शेख, प्रितम पैठणे, अमोल लांडगे आदी पुढाकार घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या