💥परभणी युवा मंच मार्फत नवोदित कवींसाठी महात्मा फुले विद्यालयात खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन.....!


💥सर्व सहभागी कवींना संस्थेकडून करण्यात येणार सन्मानपत्रांचे वितरण💥


परभणी : जिल्ह्यातील साहित्य व साहित्यिकांचा प्रसार व्हावा आणि अनेक नवोदित कवींना अनुभवी कवींचे मार्गदर्शन लाभावे या उद्देशाने ऋजू प्रतिष्ठान आणि परभणी युवा मंच मार्फत खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन, दि. १६ ऑक्टोबर, २०२२, रविवार रोजी सकाळी ठीक १० वाजता. महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे केले असून, मो न. ८८३०७५०७६३ या नंबरवर पूर्व नावनोंदणी केलेल्या सर्व वयोगटातील कवींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. सर्वाना प्रवेश मोफत आहे. सर्व सहभागी कवींना संस्थेकडून सन्मानपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त नवोदित कवींनी आणि श्रोत्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक अमोल लांडगे, प्रा. रफीक शेख, गोविंद गिरी, प्रा. राम राऊत, कलीम शेख, अझहर शेख, प्रा. गजानन कोरडे, सुरज जावळे, नीता काळे, ज्योती रन्हेर, अंबिका गायकवाड, मिलिंद खंदारे, एकनाथ भालेराव, प्रसाद जाधव, रामा रसाळ व युवा मंच परिवारच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार, श्री. अजयराव गव्हाणे, प्रसिद्ध कवी गझलकार श्री. आत्तम गेंदे नवोदितांना मार्गदर्शनही करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अमोल लांडगे यांनी दिली. सादरीकरणासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या