💥पाथरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेलू कॉर्नरजवळ पिकअप व्हॅनच्या धडकेत १९ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार...!


💥तर या घटनेत अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली💥

परभणी (दि.०४ आक्टोंबर) : जिल्ह्यातील पाथरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेलू कॉर्नरजवळ काल सोमवार दि.०३ आक्टोंबर २०२२ रोजी रात्री भरधाव वेगाने जाणार्‍या पिकअप व्हॅनने एका दुचाकीस्वारास दिलेल्या जोरदार धडकेत १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर या घटनेत अन्य एक व्यक्ती जखमी झाली.

                    पाथरी ते मानवत या रस्त्यावर सेलू कॉर्नरजवळ एका पिकअप व्हॅनने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. त्यात पाथरी येथील जैतापुर मोहल्ल्यातील आनंद लक्ष्मण हिवाळे या युवकाचा मृत्यू झाला. तर दिपक हिवाळे हे जखमी झाले. पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या