💥अंटार्टिका खंडावर जाऊन संशोधन करणे काळची गरज - डॉ.शिवाजी चव्हाण


💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात आयोजित व्याख्याना प्रसंगी डॉ.चव्हाण बोलत होते💥

पूर्णा (दि.०९ आक्टोंबर) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रणिशास्त्र विभागामार्फत डॉ.शिवाजी चव्हाण यांचे अंटार्टिका मोहीमेमधील संशोधन याविषयी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री प्रमोदअप्पा एकलारे,सचिव मा. श्री अमृतराज कदम,सहसचिव मा. श्री गोविंदराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. शिवाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिवाजी चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानातून मोहिमेतील अनुभव संशोधन विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, पृथ्वीवरील दोन वेगळे आणि मोठे खंड म्हणून उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची ओळख आहे. बर्फांच्या नद्या आणि शिखरे असलेले हे ध्रुव मानवाला नेहमीच आकर्षित करीत आले आहेत.

 महासागरांना लागून असलेले हे ध्रुव म्हणजे एक प्रकारची मोठी खाणच आहेत. त्यामुळे संशोधकांची पावले तिकडे न वळाली तर नवलच. संशोधकांनाही या ध्रुवांकडे जाण्याची इच्छा होती. पण, विविध प्रकारच्या समस्या, अडी-अडचणी लक्षात घेता ध्रुवावरील संशोधनासाठी काही दशक उजाडले. भारतीय महासागराला लागून असलेल्या दक्षिण ध्रुवावर त्यासाठी सर्वप्रथम कूच करण्यात आली. पण, अनेकांना प्रश्न पडू शकतो की, दक्षिण द्रुवाचा अभ्यास कशासाठी करायचा? त्याने काय साध्य होणार? भारताचा सर्व वातावरण मान्सून वर अवलंबून आहे  त्यावरच सारा डोलारा अवलंबून आहे. याच मान्सूनचा लहरीपणा, सध्या होत असलेले त्यातील बदल, आगामी काळात होऊ घातलेले बदल, जागतिक तपमान वाढ किंवा हवामान बदलाचा मान्सूनवर होणारा परिणाम या साऱ्याचा वेध घेणे गरजेचे आहे. बर्फाच्छादित असलेल्या प्रदेशावर जाऊन संशोधन करणे तसे आव्हानात्मकच आहे. नैसर्गिक, तांत्रिक आणि अन्य प्रकारच्याही अनेक समस्या आहेत. पण, त्यांच्यावर मात करीत अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाचा मोठा यज्ञ सुरू ठेवला आहे.देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत आहे. अशा केंद्रात काम करणे म्हणजे, देशाचे भविष्य घडविण्यासारखेच आहे.पृथ्वीचे वातावरण, सागर, जल, प्रदूषणासंबंधीच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्याचे उत्तर शोधून काढण्यासाठी या मोहिमा महत्त्वाच्या आहेत.अंटार्टिकाशी जवळचा संबंध आहे. म्हणून तेथे अभ्यास, संशोधन, शोध करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे.याविषयी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी चव्हाण यांनी केले तर आभार विभागप्रमुख डॉ. रवी बरडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या