💥पुर्णेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उद्या रविवार दि.०९ आक्टोंबर रोजी विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सवाचे आयोजन....!


💥शहरातील श्रीराम मंदिर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनाला होणार सुरूवात💥

पुर्णा (दि.०८ आक्टोंबर) - 

धर्म एवं हतो हन्ति,धर्मो रक्षति रक्षितः ! तस्मोधर्मो न हन्तव्यो,मानो धर्मो हतोवधीत !!

प्राचीन गौरवशाली काळापासून अधर्मावर धर्माची मात,विजयांची परंपरा आणि शक्तीची उपासाना यांचे एकत्रितपणे स्मरण करून देणारा हिंदु समाजाचा एक प्रमुख उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रकट स्वरूपात दरवर्षी सजरा करतो या परंपरेनुसार पुर्णेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने उद्या रविवार दि.०९ आक्टोंबर २०२२ रोजी शहरातील श्रीराम मंदिर परिसरात विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दुपारच्या सुमारास पंथसंचलनाला सुरूवात होणार असून या संचलनाची समाप्ती सायं.०४-०० वाजेच्या सुमारास जुने वैभव जिनिंग परिसरातील स्वामी विवेकानंद रुग्नालय येथे होणार असून सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास शस्त्र पुजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सवास प्रमुख वक्ते म्हणून संघाचे छत्रपती संभाजी महाराज नगर (औ.बाद) विभागीय प्रचारक श्रीरामजी पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून हभप.ॲड.यादवरावजी भवरे यांचे मार्गदर्शन लाभणार असून या विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सवास संघाच्या जास्तीतजास्त स्वयंसेवकांसह हिंदु बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुर्णा तालुका कार्यवाहक प्रविण रमेशराव अंबोरे यांनी केले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या