💥अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन....!


 💥अल्पसंख्यांक लाभार्थ्यांना शासनाच्या नोकरी विषयक लाभापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे नोंदणी आवश्यक💥

परभणी (दि.25 आक्टोंबर)  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांव्दारे त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य, व्यवसायविषयक जीवनमानात आवश्यक सुधारणा घडवून आणणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या महास्वयंम या पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.

अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी  त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य, व्यवसाय इत्यादी विषयक जीवनमानात सुधारणा करणे आवश्यक आहे. संबंधित बाबीची आकडेवारी ही शासनाच्या वेबपोर्टलवर नोंदणीपटात कमी असल्याकारणामुळे अल्पसंख्यांक लाभार्थ्यांना शासनाच्या नोकरी विषयक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर बेरोजगार असल्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर गरजू, अल्पसंख्याक उमेदवारानां खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविता येते, जिल्ह्यामध्ये आयोजित विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळते. तसेच या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन नोकरी प्राप्त करुन घेण्याची संधी उपलब्ध होते. शिवाय शासनाच्या विविध योजनांचा (शैक्षणिक कर्ज, व्यावसायीक कर्ज, उद्योग विषयक कर्ज तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण इ.) लाभ घेण्यासाठी व शासकीय, निमशासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित संस्था, शासनाची विविध महामंडळे, खाजगी क्षेत्र इत्यादीमध्ये नोकरीची संधी मिळविण्यास या पोर्टलवर अल्पसंख्याक बेरोजगारांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे श्री. खंदारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

तरी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी  वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन श्री. खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी कार्यालयास किंवा 02452-220074 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या