💥परभणीत ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...!


💥या शिबिरात हृदयरोग,अस्तिरोग,त्वचारोग,नेत्ररोग,बालरोग इत्यादी रोगांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार💥

परभणी (दि.०५ आक्टोंबर) - शहरातील संजय गांधी नगर येथे जश्ण ए ईद ए मिल्लादुन्नबीच्या पवित्र दिनानिमित्त उडान सेवाभावी संस्था व एस. के. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दि. 9 ऑक्टो. रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, अस्तिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, बालरोग इत्यादी रोगांवर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हा आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे. 

या शिबिरास उपस्थित राहून आपल्या आजारांवर उपचार करून घ्यावेत असे आव्हान एस. के. गौस, बादल भैया, अमोल पाथरीकर, ख्वाजा भाई, रशीद खान, गफ्फार खान, शेख माजिद शेख मोईन ,शेख इरफान, शेख अझहर, इत्यादींच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या