💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवीची सुरक्षा वाढवली : शिंदे गटात प्रवेश करणार ?


✍️ मोहन चौकेकर

💥आमदार राजन साळवींना "वाय प्लस" दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे💥

रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तटकरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. दरम्यान, तटकरे यांच्या प्रवेशानंतर आता उद्धव ठाकरे गटातील  आमदार राजन साळवी  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजन साळवी यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. राजन साळवी हे राजापूर-लांजा विधानसभेचे आमदार आहेत. त्यांची सुरक्षा वाढविल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, सुरक्षा वाढवल्याने ते शिंदे गटात जाणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांनी राजन साळवींना सुरक्षा का दिली असावी यावरून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

* शिवसेना-कॉंग्रेसचे 4 नगरसेवक भाजपात दाखल –

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरा भाईंदर महापालिकेत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. पालिकेतील चार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यातील तीन नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटातील असून एक नगरसेवक कॉंग्रेस पक्षाचे आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या